पाकिस्तानविरोधात बांगलादेशला भासणार वरिष्ठ खेळाडूंची उणीव

चटगांव (बांगलादेश) – बांगलादेशचा संघ अलीकडेच टी-२० मालिकेतील खराब कामगिरी मागे सोडून शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पाकिस्तानविरोधात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात या कसोटी मालिकेमध्ये बांगलादेशला हरफनमौला शाकिब अल हसनसह आपल्या अन्य वरिष्ठ खेळाडूंची उणीव भासणार आहे. टी-२० विश्व चषकादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे शाकिब वेळेत बरा होऊ शकलेला नाही, तर सलामीचा फलंदाज तमीम इकबालने दुखापतीमुळे या मालिकेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. झिम्बाब्वेविरोधातील बांगलादेशच्या मागील कसोटीमध्ये नाबाद १५० धावा करणारा महमूदुल्लाह याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. कर्णधार मोमिनुल हकने सांगितली की, टीमचे युवा खेळाडू वरिष्ठ खेळाडूंची जागा घेण्यासाठी प्रेरित आहेत. तो म्हणाला, आमच्याकडे जे खेळाडू उपलब्ध आहेत, त्यांच्यासोबतच आम्हाला खेळावे लागणार आहे. मोमिनुलने सांगितले की वरिष्ठ खेळाडूंनी बांगलादेश क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे. सोमवारी संपलेल्या टी-२० साखळीमध्ये बांगलादेशला पाकिस्तानकडून ०-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. टी-२० मालिकेमधील बांगलादेशचा हा सलग आठवा पराभव आहे. अर्थात टी-२० मधील पराभवाचा या मालिकेवर प्रभाव पडेल असे आपल्याला वाटत नसल्याचे मोमिनुलने सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …