पाकिस्तानच्या खेळाडूचा विराटवर आरोप; म्हणाला, त्याने अश्विनवर केलाय अन्याय

कराची – पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर दानिश कनेरियाने रविचंद्रन अश्विनसोबत संघात योग्य वर्तणूक न झाल्याचा आरोप केला आहे. गेल्या ३-४ वर्षांत अश्विनवर अन्याय झाला असून, विराट कोहलीने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्याला संघात स्थान दिले नाही, असे कनेरियाने म्हटले आहे. दानिश कनेरियाने एका वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी तो रविचंद्रन अश्विनबद्दल मोकळेपणाने बोलला आहे. कनेरियाने नुकतीच त्याची टी-२० इलेव्हन टीम देखील बनवली होती, ज्यामध्ये त्याने अश्विनला संघाचा उपकर्णधार बनवले होते. त्याने याचे कारण यावेळी सांगितले, तसेच बाबर आझम आणि विराट कोहली यांच्या तुलनेबद्दलही त्याने वक्तव्य केले. तो पुढे म्हणाला, विराट कोहलीने अश्विनसोबत वाईट केले. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्याला संघात स्थान मिळाले नाही. अश्विनला कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत खेळू दिले गेले नाही. टी-२० विश्वचषकात तो पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळला नव्हता. त्यावेळी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आता अश्विन जोरदार पुनरागमन करत संघात परतला आहे. दानिश कनेरियाने विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यातील तुलनेबद्दलही बातचीत केली. तो म्हणाला, बाबर आझम आणि विराट कोहली यांची तुलना करणे थोडे घाईचे ठरेल. बाबर आझमचा वाईट काळ अजून यायचा आहे, यातून तो कसा बाहेर पडतो हे पाहावे लागेल. बाबर आझमच्या करिअरची आता कुठे सुरुवात झाली आहे, तर तुलनेने विराट कोहलीने सर्वत्र फलंदाजीत स्वत:ला सिद्ध केले आहे. तो पुढे म्हणाला, जोपर्यंत बाबर आझम टी-२० किंवा वनडे नव्हे, तर कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करत नाही, तोपर्यंत ही तुलना चुकीची आहे. ज्या दिवशी तो कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करेल, आपल्या कामगिरीने संघाला विजयापर्यंत नेईल, १०० कसोटी सामने खेळेल, त्यादिवशी त्याची विराट कोहलीशी तुलना करावी लागेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …