ठळक बातम्या

पाकिस्तानचा सलामीवीर रिझवानने करून दाखवले!

लाहोर – पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मोहम्मदने ८७ धावांची विजयी खेळी करीत एक इतिहास रचला. मोहम्मदने टी-२० क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात दोन हजार धावा पूर्ण करीत विश्वविक्रम केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या टी-२० मालिकेत मोहम्मद रिझवानने फक्त सर्वाधिक धावाच केल्या नाहीत, तर त्याने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रिझवानने ही कामगिरी करताना अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना मागे सोडले आहे. ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि बाबर आजम हे टी-२० क्रिकेटमध्ये धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जातात. मैदानावर चौफेर फटकेबाजी करून खोऱ्याने धावा वसूल करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. पण या आक्रमक फलंदाजांना जे जमले नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने करून दाखवले आहे.
रिझवानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ५४ धावांवर असताना यंदाच्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. याआधी रिझवानने टी-२० इंटरनॅशनल सामन्यांमध्ये एका वर्षात एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला होता. यावर्षी रिझवानचा बेस्ट स्कोर १०४ धावा इतका होता. २०२१ मध्ये टी-२० इंटरनॅशनल सामन्यात २९ सामन्यांमध्ये रिझवानने १३२६ धावा बनवल्या आहेत. याशिवाय रिझवानने वर्षभरात ११९ चौकार लगावले असून ४२ षटकारही ठोकले आहेत. रिझवानने आतापर्यंत १३ अर्धशतके केली आहेत.
कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडिजला सात विकेट्सनी मात दिली. सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करीत २० षटकांमध्ये तीन विकेट गमावत २०७ धावा केल्या. त्यानंतर १८.५ षटकांमध्ये तीन विकेटच्या बदल्यात पाकने हे लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला.
मोहम्मद रिझवानने २०२१ या कॅलेंडर वर्षात २०३६ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर बाबर आजमचा नंबर लागतो. त्याने या वर्षात १७६९ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने २०१५ साली १६६५ धावा केल्या होत्या. विराटने २०१६ मध्ये १६१४ धावा केल्या होत्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला, तर रिझवानने २६ डावांत १३२६ धावा केल्या आहेत. रिझवानने यावर्षी ज्या प्रकारची फलंदाजी केलीय, ती प्रत्येक युवा फलंदाजाने पाहिली पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे अशा शब्दांत क र्णधार बाबर आजमने रिझवानचे कौतुक केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment