पाकिस्तानचा सलामीवीर रिझवानची अफलातून खेळी

टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस
कराची – पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ५२ चेंडंूत ७८ धावांची खेळी केली. यासोबतच रिझवानने २०२१ या वर्षात टी-२० मध्ये १२०० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने २७ सामन्यांतील २४ डावांत ही कामगिरी केली आहे. रिझवानने यंदाच्या वर्षभरात टी-२० सामन्यांत ११ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. यावर्षी रिझवानचा बेस्ट स्कोर १०४ धावा इतका होता. याशिवाय रिझवानने वर्षभरात १०५ चौकार लगावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. रिझवानने आतापर्यंत १२ अर्धशतके लगावली आहेत. ५२ सामन्यांत त्याने १ हजार ४३६ धावा केल्या आहेत, तर सर्व टी-२० सामन्यांचा विचार करता १३५ डावांत ३९च्या सरासरीने त्याने ३ हजार ८६२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …