ठळक बातम्या

‘ पांडू’ च्या कलाकारांकडून कोरोनाचा नियमभंग

  •  सेलिब्रेटी, आयोजकांवर गुन्हा दाखल होणार?

ठाणे – एका चित्रपटाच्या शोसाठी आलेल्या सेलिबे्रटींनी आनंदोत्सव साजरा करत भर गर्दीत विनामास्क डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र विनामास्क फिरणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकावर कारवाई करत प्रशासनाकडून दंड आकारणी केली जाते. मग या सेलिब्रेटींवर कारवाई होणार का? असा सवाल आरपीआय एकतावादीचे युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना काळात निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले होते, मात्र नंतर निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरिकांनी मास्क वापरने बंद केले. सध्या ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत चालले आहे. त्याचबरोबर काही नागरिक परदेशातून पुन्हा परतले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढू शकतो. त्यासाठी प्रशासनाकडून आता मास्क न वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारणी केली जात आहे, परंतु नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ठाण्यातील विवियाना मॉल येथे पांडू चित्रपटाच्या शोसाठी आलेल्या काही कलाकारांनी चित्रपटाचा आनंद साजरा करत गर्दीत डान्स केला. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन झाले. तसेच यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते. नियमांचे भंग करणाऱ्या सामान्य नागरिकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र, सेलिब्रेटींसाठी वेगळा नियम आहे का? असा सवाल उपस्थित करत या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आरपीआय एकतावादीचे युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे. ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा देहदुरीच्या (सोशल डिस्टन्स) नियमांचे पालन केले नाही, असे भय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …