पहिल्या गुन्ह्यातून छोटा राजन ३८ वर्षांनी सुटला


मुंबई – अंडर वर्ल्ड डॉन छोटा राजनची सीबीआय न्यायालयाने एका खटल्यात मुक्तता केली आहे. मुंबई अंडर वर्ल्डमध्ये डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा सर्वात मोठा दुश्मन म्हटल्या जाणाऱ्या छोटा राजनच्या गुन्हेगारी आयुष्यातील हा पहिला एफआयआर होता. १९८३मध्ये त्याने पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. छोटा राजनच्या विरोधातील हा पहिला मोठा गुन्हा होता.
१९८३ साली छोटा राजन दारू तस्करी करत होता. तेव्हा हे प्रकरण नोंद झाले होते. एका टॅक्सीतून छोटा राजन आणि त्याचे साथीदार दारूची तस्करी करत होते. तेव्हा टिळक नगर पोलीस स्टेशनच्या एका गस्तीवरील पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या पथकामध्ये दोन पोलीस अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल होते. तर राजनच्या कारमध्ये दोन अन्य साथीदार होते. पोलिसांनी राजनची टॅक्सी थांबविली. तेव्हा पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला, मात्र पोलिसांनी त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले, तर दुसरा साथीदार पळून गेला. राजनसोबत अटक झालेल्या साथीदाराला न्यायालयाने सोडले होते, तर राजनविरोधात गुन्हा सुरू होता. तो जामिनावर बाहेर आला होता.
राजनला २०१५ मध्ये इंडोनेशिया येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या काळात मुंबई पोलिसांनी हा खटला सीबीआयच्या ताब्यात दिला. सीबीआयने फायनल क्लोजर रिपोर्ट लावत म्हटले होते की, केस खूप जुनी आहे. तसेच याबाबत कोणताही साक्षीदार आणि पुरावा सापडत नाही. हल्ल्यात वापरलेला चाकूदेखील गायब झाला आहे. यावर न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला होता. त्यानंतर आता राजनची या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …