ठळक बातम्या

पहिल्यांदाच देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक

देशातील प्रजनन दरातही घट
ग्रामीण भागात महिलांची संख्या जास्त

१००० पुरुषांच्या मागे १०२० स्त्रिया
गर्भनिरोधक प्रसारातही लक्षणीय वाढ

नवी दिल्ली – देशातील महिलांबाबत खूप चांगली बातमी आली आहे. देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. आता प्रत्येक १००० पुरुषांमागे १०२० स्त्रिया आहेत. त्याचबरोबर हा विक्रमही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला आहे. ज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या १००० च्या वर गेली आहे. आणखी एक चांगली बातमी म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर देखील सुधारले आहे. २०१५-१६ मध्ये, १००० मुलांमागे ९१९ मुली होत्या, ज्या २०१९-२१ मध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली झाल्या आहेत.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधील डेटा गाव आणि शहरातील लिंग गुणोत्तराची तुलना करतो. सर्वेक्षणानुसार, शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये लिंग गुणोत्तर चांगले आहे. खेड्यांमध्ये दर १००० पुरुषांमागे १०३७ महिला आहेत, तर शहरांमध्ये ९८५ महिला आहेत. याआधी २०१९-२०२० मध्ये खेड्यांमध्ये १००० पुरुषांमागे १००९ महिला होत्या आणि शहरांमध्ये ही संख्या ९५६ होती.

देशाच्या वाढत्या लोकसंख्येबाबत चांगली बातमी समोर येत आहे. खरे तर, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ च्या दुसºया टप्प्यानुसार, देशातील एकूण प्रजननक्षमता दर किंवा स्त्रीने जन्माला मुलांची सरासरी संख्या २.२ वरून २ वर आली आहे, तर गर्भनिरोधक प्रसार दर देखील वाढला आहे आणि ५४ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …