पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

  • आजपासून शाळा, महाविद्यालय, सलून बंद

कोलकाता – देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनासह त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे देखील रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ रुग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार पश्चिम बंगालमध्ये सोमवारपासून राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यूदेखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. या निर्णयामुळे सोमवार ३ जानेवारीपासून पश्चिम बंगालमध्ये शाळा, महाविद्यालयांसोबतच जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्युटी सलून्स देखील बंद राहतील.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …