ठळक बातम्या

परीक्षेसाठी मुंबईत आलेली बोईसरची तरुणी बेपत्ता

पालघर – मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणारी बोईसरमधील एक तरुणी परीक्षेच्या दिवशीच बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. २२ नोव्हेंबरपासून ही तरुणी बेपत्ता आहे. सदिच्छा साने असे बेपत्ता तरुणीचे नाव असून, ती प्रीलियम परीक्षेसाठी मुंबईत आली होती. दुसरीकडे, सदिच्छाचे अपहरण झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. वैद्यकीय शिक्षण घेणारी सदिच्छा मनीष साने ही तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली होती, मात्र ती २९ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदिच्छा साने ही २२ वर्षीय तरुणी बोईसरमधील खोदाराम बाग येथे राहत होती. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी सदिच्छा प्रीलियमची परीक्षा देण्यासाठी ती मुंबईला गेली होती, मात्र ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रीलियमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद आला असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …