परीक्षा पुढे ढकलणे दुर्दैवी; पण कारणही तेवढेच महत्त्वाचे – रोहित पवार

मुंबई – म्हाडाकडून गृहनिर्माण विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी रात्री २ वाजता एक व्हिडीओ शेअर करत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. त्यावर आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी सकाळी उठताच त्यांना परीक्षा पुढे ढकलली गेल्याचे कळत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे, परंतु परीक्षा पुढे ढकलण्याचे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहित पवार यांनी या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याचे सांगितले आहे. ‘मोठ्या मेहनतीने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चुकीच्या गोष्टींची कुणकुण लागताच आव्हाड साहेबांनी स्पष्ट भूमिका घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी आज अडचणीचा वाटत असला तरी त्यात विद्यार्थ्यांचेच हित आहे,’ असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
तर रोहित पवार यांनी सरकारला सूचनाही केल्या आहेत, ते म्हणाले, ‘एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांची लूट करणारे व्यवस्थेतील दलाल शोधून संपूर्ण व्यवस्थाच स्वच्छ करावी लागणार आहे. सर्वच परीक्षा #एमपीएससी अंतर्गत आणणे हाच यावर उपाय असू शकतो. हे तातडीने करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसले तरी टप्प्याटप्प्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासन याबाबतीत नक्कीच सकारात्मक काम करत असलेतरी यासंदर्भात अपेक्षित वेगाने मात्र काम होताना दिसत नसल्याची खंत प्रत्येक युवकासह माझ्या मनातही आहे. लवकरात लवकर सर्व परीक्षा #एमपीएससी अंतर्गत आणण्यासाठी एक निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम आखावा, ही विनंती.’

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …