ठळक बातम्या

परळी वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी

५० लाखांच्या खंडणीची मागणी
मंदिर परिसरातली सुरक्षा वाढवण्यात आली

बीड – बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीस प्राप्त झालेल्या पत्रामुळे सध्या खळबळ माजली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या, अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देऊ, अशा आशयाचं हे पत्र आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पत्रात लिहिलं आहे की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानाचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ रक्कम देणगी रूपाने मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग्ज माफिया व गावठी पिस्तुलधारक आहे. मला ५० लाख रुपयांची तातडीने गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोहच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडच्या आरडीएक्सने उडवेन. या पत्रामुळे सध्या एकच खळबळ माजली असून, संस्थानाच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

परळी वैद्यनाथ हे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. कोविड प्रादुभार्वामुळे दिर्घकाळापासून बंद असलेलं हे मंदिर आता निर्बंध शिथिल झाल्याने खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी असते. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख मंदिरात येऊन टपालाद्वारे आलेली पत्रे पाहत असताना, त्यांना हे पत्र आढळले. हे पत्र व्यंकट गुरुपद मठपती या नावाने आले होते. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर, विष्णुपुरी, नांदेड या पत्त्यावरून हे पत्र आले होते.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …