परमबीर सिंग सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणाचा तपास करणाºया चांदिवाल आयोगासमोर सोमवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चौकशीकामी हजर राहणार आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली. आयोगाच्या वतीने परमबीर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र परमबीर सिंह यांना न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्याने त्यांनी त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीला सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील •ा्रष्टाचाराच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती चांदिवाल चौकशी आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणी जबाब नोंदवण्यात आला, मात्र गेल्या सात महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे अनेकदा समन्स बजावूनदेखील चांदिवाल आयोगासमोर हजर झाले नव्हते. त्यांना आयोगाकडून दोन वेळा दंडही लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वारंट बजावण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. अशातच परमबीर सिंह यांच्या वकिलाने परमबीर हे आयोगासमोर सोमवारी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. बेपत्ता परमबीर हे गुरुवारी मुंबईत दाखल झाले. त्यांची गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात कांदिवली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात तास चौकशी केली. शुक्रवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परमबीर यांची खंडणी प्रकरणात चौकशी केली. आता ते सोमवारी चांदिवाल आयोगासमोर हजर राहून १०० कोटी वसुली प्रकरणाबाबत आपला जबाब नोंद करणार आहेत. चार दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …