परमबीर सिंग यांनी दहशतवाद्यांना मदत केली – शमशेर पठाण यांचा आरोप

 मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावणारे आणि स्वत: अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर आरोपाचा नवा बॉम्ब फुटला आहे़ हा आरोप दुसरे तिसरे कुणी नव्हे, तर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केला आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याचा फोन परमबीर सिंग यांनी लपवला, असा आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे. तसेच, त्यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा खळबळजनक आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे़
पठाण यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात म्हटले आहे की, त्यांना अशी शंका आहे की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात परमबीर सिंग यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता.

अजमल कसाबचा मोबाइल सिंग यांनी चौकशीसाठी घेतला होता. त्यावेळी ते महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे ट्रान्सफर केली होती. त्यानंतर सिंग यांनी तो मोबाइल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मोबाइलवरून या हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हँडलरशी संवाद करत होते. त्यानंतर त्यांनी मोठा हल्ला केला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असं पठाण यांनी म्हटले आहे.
परमबीर सिंग यांना आता फरार घोषित केल्यानंतर त्यांना पदावरून दूर केले जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ते आयपीएस अधिकारी असल्याने त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे; पण राज्य केंद्राला तशा प्रकारची शिफारस करू शकते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …