परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकाराचा हात – शेलार

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचेआरोप करून राज्य सरकारला अडचणीत आणणारेव सध्या गायब असलेले मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ठावठिकाण्यावरून महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्येजुंपली आहे. परमबीर सिंग यांना पळून जाऊ देण्यामागे ठाकरे सरकारच आहे. यामागे मोठे कटकारस्थान आहे, असा गंभीर आरोप भाजपनं केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी परमबीर यांचा उल्लेख करत थेट केंद्रसरकारवर आरोप केले. परमबीर रस्तेमार्गे विदेशात गेला असेल तर ज्या राज्यांतून जाऊ शकतो, त्या राज्यात भाजपची सरकारेआहेत, असा आरोप मलिकांनी केला.नवाब मलिक यांचा आरोप भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी खोडून काढला आहे. नवाब मलिक हेकपोलकल्पित आरोप करत आहेत. मुळात परमबीर सिंग यांचेघर महाराष्ट्रात आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड महाराष्ट्रातील आहे. मग तो महाराष्ट्रातून पळून कसा गेला, याच उत्तर राज्यातील सरकारनेद्यायला हवे. महाराष्ट्रात अशी कुठली एजन्सी आहेआणि असेकोण लोक आहेत, जे परमबीर यांना मदत करत आहेत. परमबीरच्या मार्फत राज्य सरकारनं अशा कुठल्या कारवाया केल्या आहेत की, राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य कोणताही मंत्री त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही. परमबीर सिंग हा महाराष्ट्रसरकारचा जावईअसल्यासारखेवर्तन का केले जात आहे, असा सवाल शेलार यांनी केला.
परमबीर सिंगची मालमत्ता जप्त का केली गेली नाही? लूकआउट नोटीसला उशीर का झाला? परमबीर पळून जाईपर्यंत राज्य सरकारनं वाट का पाहिली? अशा कोणत्या गोष्टी ठाकरे सरकारनं परमबीर सिंगकडून करून घेतल्यात, ज्या उघड झाल्या असत्या तर अडचण झाली असती. परमबीर पळून गेलाच असेल तर त्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंगकडेया सरकार विरोधात बरीच माहिती आहे. तो सापडला तर सरकारचं पितळ उघडेपडेल, त्यामुळेच सरकार त्याला पळायला मदत करतंय. हा एक मोठा डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला. विदेशात त्यांना राजकीय आश्रय मिळावा यासाठीही ठाकरे सरकार प्रयत्न करत असावे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …