परमबीर सिंग कथित वसुलीप्रकरणी अटक पोलिसांना सीआयडी कोठडी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरोधातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि निरीक्षक आशा कोरके यांना येथील न्यायालयाने मंगळवारी सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. कथित वसुली प्रकरणात महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी)ने मुंबई गुन्हे शाखेत यापूर्वी तैनात असलेल्या या दोघांनाही सोमवारी अटक केली होती. हे दोन्ही पोलीस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
या दोन अधिकाऱ्यांपैकी एक पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे हे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात, तर पोलीस निरीक्षक आशा कोरके हे नायगाव येथे तैनात आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. रिअल इस्टेट व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी २२ जुलै रोजी त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये परमबीर सिंग यांच्यासह सात जणांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे न्यायालयापाठोपाठ मुंबईतील किल्ला न्यायालयानेही परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या याचिकेवर सुनावणी करताना हे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटींविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली होती; मात्र अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …