बॉलीवूड अभिनेत्री मौनी राय ही नेहमीच आपल्या कातिलाना अदांनी चाहत्यांना वेडावून सोडत आली आहे. सोशल मीडियावर नेहमी आपले बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या मौनीला चाहत्यांकडून कायमच पसंती मिळते. आताही मौनीने स्वत:चे काही हॉट फोटो पोस्ट केले आहेत ज्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धमाका केला आहे.
या फोटोत पाहायला मिळते की, मौनी ही सफेद रंगाच्या बिकनीत असून तिने आपले केस मोकळे सोडले आहे. त्याचबरोबर ती कॅमेऱ्याकडे तितक्याच ग्लॅमरस अंदाजात पाहतानाही दिसते. तर दुसऱ्या फोटोत मौनी पूलमध्ये चील करताना दिसून येते. तिचा हा अंदाजही प्रेक्षकांना खूपच आवडला असून, कमेंट बॉक्समध्ये तिचा उल्लेख हॉटी मौनी राया असा करण्यात आला आहे.
प्रख्यात टीव्ही मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मौनीचा उल्लेख आजच्या घडीला बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये केला जातो. मौनी ‘गोल्ड’ या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर दाखल झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच हिट झाला होता.