पत्नीवर वैतागलेल्या पतीने सांगितले मला तुरुंगात टाका

आतापर्यंत तुम्ही गुन्हेगारांना तुरुंगाबाहेर पाठवण्याची सेटिंग पोलिसांकडून ऐकली असेल, परंतु इटलीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इथे एका गुन्हेगाराने पोलिसांसमोर हात जोडून सांगितले की, मला माझ्या घरातून बाहेर हाकलून द्या आणि काहीही करून तुरुंगात टाका. अमली पदार्थाच्या गुन्ह्यात गुन्हेगाराला नजरकैदेत ठेवले; पण त्याची अवस्था अशी झाली की, तो स्वत:च पत्नीच्या अत्याचारातून त्याची सुटका व्हावी, म्हणून त्याला घरातून बाहेर काढावे आणि तुरुंगात टाकावे, अशी विनंती पोलिसांना करू लागला.
तुरुंगात जावे लागणार हे ऐकूनच भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटतो. त्यांना तुरुंगात जावे लागू नये, यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. अशा वेळी जर कोणी स्वत: पोलिसात जाऊन मला तुरुंगात टाका, असे म्हणत असेल, तर गोष्ट पचनी पडत नाही; मात्र घरगुती अत्याचार सहन होत नसल्याने तुरुंगात जाऊ इच्छिणाºया व्यक्तीची मानसिक स्थिती काय असेल, याचाही विचार करावा लागेल. हे प्रकरण इटलीच्या गुइडोनिया मोंटेसेलिओचे आहे, जिथे पत्नीच्या अत्याचारामुळे हैराण झालेल्या पतीने पोलिसांना तुरुंगात जाण्याची विनंती केली.

एएफपीच्या म्हणण्यानुसार, ३० वर्षीय अल्बेनियन वंशाचा माणूस स्वत: पोलीस ठाण्याला पोहोचला आणि त्याने एका पोलीस अधिकाºयाला सांगितले की, तो आता आपल्या पत्नीसह घरात राहू शकत नाही. ही व्यक्ती नजरकैदेत असून, पत्नीसोबत राहण्याऐवजी तुरुंगात राहण्याची मागणी करत असल्याची माहिती कॅराबिनेरी पोलिसांकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. यामुळे त्याला नजरकैदेची मागणी करण्यात आली. त्याच्या शिक्षेला अजून काही वर्षे बाकी असली, तरी या गुन्हेगाराने पोलिसांचे अत्याचार पत्नीच्या अत्याचारापेक्षा कमी असल्याचे सांगून, त्याला तुरुंगातच राहायचे असल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की, तो यापुढे घरगुती वातावरण सहन करू शकत नाही आणि तुरुंगात राहून त्याची उर्वरित शिक्षा भोगायची आहे. हे प्रकरण स्वत:च अद्वितीय आहे.

पोलिसांनी या व्यक्तीची व्यथा तात्काळ समजून घेत त्याला नजरकैदेतून बाहेर काढले आणि न्यायालयीन अधिकाºयांसमोर हजर केले. त्याला तुरुंगात टाकण्याचे आदेश मिळाले हे त्याचे नशीब. ही घटना सोशल मीडियावर पोहोचताच लोकांनी अनेक विनोदी कमेंट करायला सुरुवात केली. जुन्या म्हणीची आठवण करून देत एका युझरने लिहिले – ‘भांडखोर महिलेसोबत राहण्यापेक्षा वाळवंटात राहणे चांगले.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …