ठळक बातम्या

पतंगाच्या दोºयासह माणूस गेला हवेत उडून

ही घटना विनोदी नसून प्रत्यक्षात एका समुद्रकिनाºयावर घडली, जिथे पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू होती. आता या घटनेशी संबंधित एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या पतंगासह उंच उडताना स्पष्टपणे दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ जाफना, श्रीलंकेचा आहे. येथे पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू होती. दरम्यान, तो आपल्या टीमच्या मदतीने दोर पकडून हवेत मोठा पतंग उडविण्याचा प्रयत्न करत होता. पतंग हवेत उडाला, मात्र दोरी धरलेल्या व्यक्तीही पतंगासोबत हवेत उडल्याने तेथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले. हे पाहून ही व्यक्ती हवेत सुमारे ३० फूट उंचीवर गेली. त्याला हवेत उडताना पाहून लोक घाबरले, तर स्वत: त्या व्यक्तीची अक्षरश: भीतीने गाळण उडाली होती.

पतंगाची दोरी धरून हवेत उडणाºया या माणसाला आपण खाली येऊ शकणार नाही असे वाटल्याने अखेर त्याने आपल्या हातातील दोरी सोडली आणि तो थेट जमिनीवर पडला. मात्र, एवढ्या उंचीवरून पडल्यानंतर ही व्यक्ती जखमी झाली. स्थानिक वृत्तानुसार, या व्यक्तीला त्याच्या टीमसोबत मोठा पतंग उडवून पतंग उडवण्याची स्पर्धा जिंकायची होती. याचदरम्यान त्यांच्यासोबत हा अपघात झाला आणि त्यांचीच तारांबळ उडाली. सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ खूप बघत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …