पंतप्रधान मोदींनी सहकाराला जगवण्याचेकाम केले- देवेंद्र फडणवीस

मुंबई – प्रवरानगर येथेदेशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्यालात अमित शाहांच्या उपस्थितीतच देवेंद्र फडणवीसांनी टोलेबाजी केली. सहकार चळवळ मोडीत निघाली आहेत, सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जगविण्याचे काम केले त्यांनी म्हटलेआहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांवर नाव न घेता सहकारी साखर कारखानेनेत्यांच्या घशात घातलेअशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणालेकी, अनेक लोक सहकारी चळवळ धोक्यात आहे असं सांगतात. पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत आणि ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकाराचे कारखाने खासगीत त्यांनी नेले आहेत आणि आता तेच शिकवतायत की सहकार चळवळ देखील अडचणीत आहे, असं फडणवीस म्हणाले. माझा त्यांना सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे, तर तुम्ही त्या चळवळीला मदत करा, असं देखील त्यांनी नमूद केलं.
एमएसपी लावल्याने साखर कारखाने तरले आहेत. अमित शाह हे सहकारी चळवळीतून तायर झालेले नेते आहेत. त्यांनीच इथेनॉलसंदर्भात निर्णय घेतला. इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांची स्थिती सुधारली. कारखान्यांचा होणार तोटा इथेनॉलमुळे भरून निघेल. साखर कारखान्यांनी २ पैसे दिले तर त्यांना अमित शाह यांनी इनकम टॅक्सच्या जाचातून सोडवलेआणि ३० वर्षाचा प्रश्न मार्गी लागला, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. कारखान्यांना मदत करण्याऐवजी ते कारखाने खासगीमध्ये कवडीमोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि त्याच कारखान्याच्या जमिनी कोट्यवधींना विकायच्या किंवा गहाण टाकायच्या आणि त्यातून पुन्हा कारखाने उभे करायचे हे शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खासगी लोकांच्या घशात टाकण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे”, असं ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …