पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

नवी दिल्ली – क्रिप्टो करन्सीवर देशात गोंधळाची स्थिती असतानाच आणि सरकारने अशा करन्सीला मान्यता द्यायला नकार दिलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट रविवारी हॅक झाले. पहाटेच्या सुमारास हॅकर्सनी हा प्रताप केला. मोदींच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉइनच्या संदर्भात ट्विट केले गेले आहे. त्या ट्विटमुळे खळबळ माजली, कारण हे ट्विट सरकारने बिटकॉइनच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याच्या एकदम उलट आहे, पण नंतर नरेंद्र मोदी यांचे हे ट्विटर हँडल पुन्हा सुरक्षित केले गेले.
रविवारी पहाटेच्या सुमारास म्हणजेच २ वाजून ११ मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले. हॅकर्सनी मग त्याचा वापर बिटकॉइनसंदर्भात घोषणा करण्यासाठी केला. भारताने बिटकॉइन कायद्याला रितसर मंजुरी दिली आहे आणि सरकार ५०० बीटीसी खरेदी करून लोकांना वाटत आहे, असे हॅकर्सनी ट्विट केले, पण हॅकर्सचा हा गोंधळ फार काळ चालला नाही. दोन मिनिटांनंतर हे ट्विट डिलीट केले गेले. नंतर पुन्हा २ वाजून १४ मिनिटांनी पुन्हा ट्विट केले गेले. ज्यात पुन्हा आधीचाच मजकूर होता, बिटकॉइनला मान्यता देणार. त्यानंतर पुन्हा हे बेकायदेशीर ट्विटही डिलीट केले गेले, पण तोपर्यंत लोकांनी त्याचे स्क्रिनशॉट घेऊन व्हायरल केले. बिटकॉइन हा ज्वलंत प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या निर्णयाचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले नाहीत तर नवलच, पण पुन्हा एकदा पंतप्रधानांचे ट्विटर हँडल सुरक्षित नसेल, तर सामान्यांचे काय?, असा सवाल चर्चिला जात आहे. मोदींच्या ट्विटर हँडलला गंभीर धोका असल्याचेही जाणकारांना वाटते.
पंतप्रधान मोदींचे ट्विटर हँडल हॅक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली. त्यातही बिटकॉइनसंदर्भात आधीच गोंधळ आहे. हॅकर्सच्या ट्विटने त्यात आणखी भर पडली. पंतप्रधान कार्यालयाने नंतर रितसर ट्विट करीत माहिती दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड केली गेली होती, जी तात्काळ दुरुस्त करीत सुरक्षित केली गेली. याची माहितीही ट्विटरला दिली गेली आहे. ज्या काळात ट्विटर अकाऊंटमध्ये गडबड केली गेली, त्याकाळात केल्या गेलेल्या ट्विट्सकडे दुर्लक्ष करा.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …