ठळक बातम्या

पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे भारत मजबूत स्थितीमध्ये

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो. कोरोनाकाळात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली होती; मात्र तिला पूर्वपदावर आणण्यासाठी देखील सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, कोरोना काळात सरकार कायम जनतेच्या पाठिशी उभे राहिले, लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यांत सरकारने नागरिकांना सर्व सुविधा घरपोच दिल्या.
मोदींचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, कोरोना काळात देशाची परिस्थिती बिकट बनली होती. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत होता. कोरोना परिस्थितीवर मात करण्याचे मोठे आव्हान देशासमोर होते. पंतप्रधान मोदींनी हे आव्हान स्वीकारले आणि देशाला कोरोना परिस्थितीमधून बाहेर काढले. कोरोना काळात त्यांनी ज्या-ज्या योजना आणल्या, जे-जे निर्णय घेतले त्याचे जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)कडून देखील कौतुक करण्यात आले.
यावेळी जेपी नड्डा यांनी निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढवल्याबद्दल पक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचे देखील अभिनंदन केले. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपला होणाऱ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपचाच विजय होईल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …