चंदिगड – पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या संयुक्त पथकाने तार्न तरन जिल्ह्यातील खेमकरण परिसरातील भारत-पाकिस्तान सीमेजवळून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने बुधवारी ही माहिती दिली. पंजाब पोलीस आणि बीएसएफ यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमध्ये २२ पिस्तुल, ४४ मॅगझिन्स आणि १०० काडतुसे हस्तगत करण्यात आल्याचे या पोलीस अधिकाºयाने सांगितले. यावेळी एक किलो वजनाचा हेरॉईन हा अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याचे या अधिकाºयाने नमूद केले. एका भाताच्या शेतात हा सर्व साठा लपवण्यात आला होता, अशी माहिती या अधिकाºयाने दिली.
पोलीस महासंचालक इक्बाल प्रीत सिंग यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान सीमेजवळ मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा आणि हेरॉईन लपवून ठेवले गेले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने तेथे शोधमोहीम हाती घेतली होती. प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा व हेरॉईन पाकिस्तानी तस्करांनी भारतीय प्रदेशातील कुं पणापलीकडे लपवून ठेवल्याचे व तो भारतातील त्यांच्या हस्तकांकडून ताब्यात घेतला जाणार होता, असे निष्पन्न झाल्याचे एका अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहिता (आयपीसी), एनडीपीएस अधिनियम, शस्त्र कायदा आणि वित्त कायदा यांमधील विविध कलमांन्वये अमृतसरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस महासंचालक इक्बाल प्रीत सिंग यांनी सांगितले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …