पंजाबच्या लुधियाना कोर्टात स्फोट; दोन ठार, अनेक जण जखमी

चंदिगड – पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारच्या सुमारास घडला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला असून, त्यामध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती समोर आली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यामुळे न्यायालयात स्फोट झालेल्या ठिकाणच्या भिंतींना तडे गेले, तर बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. न्यायालयाच्या दुसºया मजल्यावर हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नेमका स्फोट कशामुळे झाला, याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही, मात्र न्यायालयाच्या आवारातच नाही, तर थेट न्यायालयाच्या इमारतीमध्ये दुसºया मजल्यावर हा स्फोट झाल्यामुळे यावरून परिसरात खळबळ उडाली.
गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास न्यायालयाच्या आवारामध्ये अचानक स्फोट झाल्याचा आवाज झाला. त्यानंतर हा स्फोट न्यायालयाच्या इमारतीच्या दुसºया मजल्यावर झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तातडीने हा परिसर बंद केला. अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. न्यायालयाच्या इमारतीच्या दुसºया मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

नेटिझन्सकडून सोशल मीडियावर स्फोट झालेल्या ठिकाणचे व्हिडीओ ट्विट केले जात आहेत. लुधियाना जिल्हा कोर्टाचा हा आवार शहराच्या मध्यभागी असलेल्या जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयाच्या जवळच आहे. त्यामुळे या घटनेचा गांभीर्याने तपास होण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत मृतांसाठी शोक व्यक्त केला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …