पंकज अडवाणीने पटकावले ११वे राष्ट्रीय बिलियर्ड्सचे जेतेपद

भोपाळ – देशातील अग्रगण्य क्यू खेळाडू पंकज अडवाणीने आपल्या राष्ट्रीय बिलियर्ड्स जेतेपदाचा बचाव करताना ध्रुव सितवालाचा येथे नऊ गेमच्या फायनलमध्ये ५-२ असा पराभव करत ११ व्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या सामन्यात सितवालाच्या ६४ व ४२ स्कोरनंतर अडवाणीने ५६ व ४६ च्या स्कोरसोबत सुरुवाती दोन गेमनंतर स्कोर १-१ असे केले. सितवालाने तिसऱ्या गेममध्ये ८४ च्या स्कोरसोबत पुन्हा एकदा आघाडी मिळवली. तो चौथ्या गेमनंतर १०१ चा स्कोर आपल्या नावे करण्याच्या समीप पोहचलेला, पण एका चुकीने अडवाणीला पुनरागमन करण्याची संधी मिळाली, ज्याने १२७ चा ब्रेक बनवला. सुरुवाती चार ब्रेकनंतर स्कोर २-२ असा बरोबरीवर होता. अडवाणीने त्यानंतर सलग दोन गेममध्ये १५० चा समान स्कोरसह आपली आघाडी ४-२ केली. सितवालाने दरम्यान पराभव पत्कारला नाही व कौशल्य तसेच धैर्याने शानदार कामगिरी करताना १३४ चा स्कोर मिळवला. पण पुढे तो ही लय कायम राखू शकला नाही व अडवाणीला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. अडवाणीने १४८च्या ब्रेकसह गेम व सामना आपल्या नावे केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …