न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे धोकादायक; सरकारने गांभीर्याने घ्यावे – फडणवीस

नागपूर – न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. हे धोकादायक असून, सरकारने गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले. त्यात हिंदूंची घरे जाळली. दुकाने टार्गेट केली गेली. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकीच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. न घडलेल्या घटनेवरून होणारे आंदोलन हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा. खरेतर शुक्रवारनंतर शनिवारीही अमरावतीमध्ये मोर्चे निघतच आहेत. यामुळे हिंसक वळण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. अमरावतीत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. शांतता राखणे गरजेचे आहे. आम्ही कुठल्याही दंगलीचे समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …