हॉलीवूड स्टार जेनिफर लॉरेन्स हिचे न्यूड फोटो ऑनलाईन लीक झाल्यापासून तिला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला असून तब्बल सात वर्षे लोटली तरीही ती अद्याप या धक्क्यातून सावरु शकली नसून ती प्रचंड मानसिक तणावातून जात आहे. याविषयीचा खुलासा जेनिफरने तब्बल 7 वर्षांनी केला आहे.
सन 2014 मध्ये हॅकर्सनी अनेक सेलीब्रेटींचे 500 हून अधिक प्रायव्हेट फोटोज ऑनलाईन लीक करुन एका वेबसाईटवर अपलोड केले होते. या सेलीब्रेटींमध्ये जेनिफर व्यतिरिक्त रिहाना आणि सेलेना गोमेजसारख्या स्टार्सचाही समावेश आहे. याविषयी एका मॅगझीनशी बोलताना जेनिफर लॉरेन्सने सांगितले की’ कोणी माझ्या मर्जीशिवाय कुठेही आणि कधीही माझी न्यूड बॉडी ऑनलाईन पाहू शकते. फ्रान्सच्या कुणा व्यक्तीने हे फोटो ऑनलाईन प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मी नेहमीच मानसिक धक्क्यात राहणार आहे.’ दरम्यान जेनिफरने याविषयी देखील सांगितले जेव्हा 2017 मध्ये तिला वाटले होते की आता ती मरणार.त्यावेळी जेनिफरने आपले शहर केंटकीतून न्यूयॉर्क सिटीसाठी प्रायव्हेट प्लेन घेतले होते. अचानक त्या विमानाचे दोन इंजिन फेल झाले होते. जेनिफर म्हणाली,’ आम्हाला सर्वांना वाटले की आम्ही आता मरणार आहोत. मी आपल्या कुटुंबाला व्हॉईस मेसेज पाठवायला सुरुवात केली होती की मी खूप चांगले आयुष्य जगले. मला माफ करा.’
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या जेनिफर आपला आगामी चित्रपट डोंट लुकअपच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा एक सायन्स फिक्शन ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटात जेनिफर लॉरेन्स व्यतिरिक्त लियोनार्डो डिकॅप्रियो, रॉब मॉर्गन, मॅरील स्ट्रीप सारखे बडे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट येत्या 10 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात तर 24 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …