नौदलाकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

विशाखापट्टणम – ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदिपूर येथेसुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस एअर-टू-एअर व्हेरिएंटची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आल्यानंतर भारताने मंगळवारी पश्चिम किनाऱ्यावर भारतीय नौदलाची विशाल युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणमवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. समुद्रातून समुद्रात मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्र प्रकाराची कमाल मर्यादेपर्यंत चाचणी करण्यात आली. यात या क्षेपणास्त्राने टार्गेट जहाजावर अचूक निशाणा साधला, अशी माहिती भारतीय नौदलातील सूत्रांनी दिली आहे. भारताने देशाच्या सागरी सीमा आता अधिक सुरक्षित होणार आहेत. कारण, भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र दाखल होणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सतत तणाव असताना भारताने ही चाचणी केली आहे. हा एक प्रकारे त्यांना इशारा देण्याचाच प्रयत्न आहे.
यापूर्वी, 8 डिसेंबर रोजी, सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस एअर-टू-एअर व्हेरिएंटची ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदिपूर येथेयशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ब्रह्मोसच्या विकासातील एक प्रमुख महत्वाचा टप्पा म्हणून या मोहिमेचे वर्णन करताना, सूत्रांनी सांगितले की, सुपरसॉनिक लढाऊ विमान सुखोई ३० एमके-आय वरून याची चाचणी घेण्यात आली आहे. या प्रक्षेपणामुळे हवेतून हवेत मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अचूकता त्याला अधिक घातक करते. त्याची रेंजही वाढवता येते. याशिवाय हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारपासून वाचण्यातही पटाईत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र रशिया आणि भारताचा संयुक्त प्रकल्प म्हणून तयार करण्यात आले होते. यामध्ये ब्रह म्हणजे ‘ब्रह्मपुत्रा’ आणि मोस म्हणजे ‘मॉस्कवा’. मॉस्क्वा हे रशियात वाहणाऱ्या नदीचे नाव आहे. ब्रह्मोस २१ व्या शतकातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांमध्ये गणले जाते, जे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र ताशी ४३०० किमी वेगाने शत्रूचे स्थान नष्ट करू शकते. तर याद्वारे४०० किमी अंतरापर्यंत शत्रूला लक्ष्य करता येते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …