ठळक बातम्या

नोव्हेंबरच्या सुरुवातीला पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता – हवामान विभागाचा इशारा

मुंबई- पावसाचे दिवस संपले असून दिवाळीपासून साधारणत: हिवाळ्याला सुरुवात होत असते. राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहुल लागणार असताना आता पावसाचे पुन्हा एकदा संकट ओढवलेआहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रआणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागानेदिलेल्या माहितीनुसार १ ते ३ नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा सांगली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे,त र सोलापुराला ३ नोव्हेंबर रोजी हवामान विभागानेयलो अलर्टजारी करण्यात आला आहे. १,२ नोव्हेंबरला राज्यात दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जने सह पावसाची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरला नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ४ ते१० नोव्हेंबर एक कमी दाबाचे क्षेत्र द-पू बंगालच्या उपसागरात तयार होत असून ते जास्त तीव्र न होता पश्चिमेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. ६-११ नोव्हेंबर दरम्यान ह्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …