नोवाक जोकोविच यंदाचा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन

सातव्यांदा मिळवला बहुमान
नवी दिल्ली – टेनिस स्टार नोवाक जोकोविच याने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. सात वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन बनणारा जोकोविच हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने पीट सम्प्रास यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. जोकोविचच्या आधी पीट सम्प्रास यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान मिळवला होता. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) ने गुरुवारी याबाबतची घोषणा केली. यासंदर्भात इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या ट्विटर हँडलवरून ट्विटही करण्यात आले आहे.
नोवाक जोकोविचसाठी हे वर्ष उत्तम ठरले. त्याने यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन ग्रँड स्लॅम टुर्नामेंट या स्पर्धा आपल्या नावे केल्या. तर यूएस ओपनमध्ये जोकोविच उपविजेता ठरला. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये जोकोविच उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. जर जोकोविचला यूएस ओपन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी खेळी करता आली असती, तर त्याने गोल्डन स्लॅम आपल्या नावे केले असते. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर जोकोविच सध्या रॅकिंगमध्ये टॉपवर आहे. टॉप रॅकिंगसह त्याने सातव्यांदा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आपल्या नावे केला आहे. जोकोविचपूर्वी अमेरिकेचे माजी दिग्गज टेनिसपटू पीट सम्प्रास यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला होता.
जोकोविचने आपल्या करिअरमध्ये एकूण २० ग्रँड स्लॅम किताब पटकावले आहेत. जोकोविचने ग्रँड स्लॅमचा किताब पटकावण्याच्या बाबतीत टेनिसस्टार राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्याशी बरोबरी केली आहे. नोवाकचा सध्याचा फॉर्म पाहता, तो पुढच्या महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनचा किताबही आपल्या नावे करण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. जर नोवाकने असे केले, तर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांना मागे टाकत तो सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा बहुमान तो मिळवू शकतो.
दरम्यान, यंदाच्या वर्षात आपला पहिला विम्बल्डन किताब जिंकणारी महिला टेनिसपटू एश बर्टीनेदेखील रॅकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. अशातच तिने दुसऱ्यांदा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येही बर्टीने कांस्य पदक पटकावले होते. यापूर्वी २०१९ मध्ये बर्टीला आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा बुहमान मिळाला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …