नोरा फतेहीला दिलासा; जॅकलिन अजूनही ईडी चौकशीच्या फेऱ्यात!

मुंबई – दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. अभिनेत्री अजूनही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनच्या भूमिकेची अद्याप चौकशी सुरू आहे. ईडी तिच्याविरोधात दुसरी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे. पहिले आरोपपत्र दाखल केल्यानंतर जॅकलिनची ईडीने दोनदा चौकशी केली होती.
मात्र, नोरा फतेहीला याप्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, तिच्याविरोधात कोणतीही लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही. ईडीच्या आरोपपत्रात नोराला प्रोसिक्युशन ४५ असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, जॅकलिनसाठी त्रास सुरूच आहे. ईडीच्या आरोपपत्रात त्यांचा फिर्यादी साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही.
हे प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून दोनशे कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. यादरम्यान सुकेशचे जॅकलिनसोबतचे कनेक्शन समोर आले आहे. सुकेश सांगतो की, त्याने अभिनेत्रीला अनेक आलिशान भेटवस्तू दिल्या आहेत. त्यानंतर सुकेश आणि जॅकलिनचे काही फोटोही सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यात दोघांमधील जवळचे नाते दिसून येत होते.
सुकेशने जॅकलिनला १० कोटी रुपयांपर्यंतच्या गिफ्ट्स दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ५२ लाखांचा घोडा आणि ९ लाखांच्या मांजरीचा समावेश आहे. सुकेशने नोराला भेटवस्तूही दिल्याचे वृत्त समोर आले आहे. सुकेशने नोराला आयफोन आणि बीएमडब्ल्यू कार भेट दिली. आता ईडीचीही दोन्ही अभिनेत्रींवर नजर आहे. जॅकलिन आणि सुकेशची नावे सध्या खूप चर्चेत आहेत, त्यामुळे निर्माते या दोघांवर चित्रपट किंवा मालिका बनवण्याचा विचार करीत आहेत. एका निर्मात्याने सुकेश आणि जॅकलिनच्या कथेत रस दाखवला आहे. या दोघांवर एक कथा आणण्यासाठी उत्सुक असलेले निर्माते कोण आहेत, हे अद्याप कळलेले नाही. या सीरिजचे नावही समोर आलेले नाही आणि या सीरिजमध्ये दोघांची भूमिका कोण साकारणार? हेही अद्याप समोर आलेले नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …