नॉर्जे जायबंद; भारतविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्जे जायबंद झाल्यामुळे भारतविरुद्ध आगामी मालिकेतून मंगळवारी बाहेर झाला, पण क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए)ने त्याच्या दुखापतीबाबत स्पष्ट काही सांगितलेले नाही. संघात त्याच्या जागी कोणाचाच समावेश करण्यात आलेला नाही.

नॉर्जेने १२ कसोटींत ४७ विकेट घेतलेत, ज्यात तीनवेळा पाच विकेट मिळवण्याचा समावेश आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाईल. सीएसएने दिलेल्या माहितीनुसार, प्रोटियाज (दक्षिण आफ्रिकन) गोलंदाज एनरिच नॉर्जे सलगच्या दुखापतीमुळे भारतविरुद्धच्या तीन कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दुर्दैवाने तो कसोटी सामन्यात गोलंदाजीसाठी योग्य वेळी सावरण्यास यशस्वी राहिला नाही. तो दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. अद्याप त्याच्या जागी कोणत्याच खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. नॉर्जेने आयपीएलमध्ये सलग चांगली कामगिरी केली व त्याचा संघ दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …