ठळक बातम्या

नैतिकता व महत्त्वाकांक्षांची अनोखी कथा ‘चुंबक’

नैतिकता व महत्त्वाकांक्षा यामधून एकाची निवड करण्­याच्­या सातत्­यपूर्ण संघर्षाबाबतची कथा घेऊन येत आहे, सोनी लिव्­हवरील पुरस्­कार प्राप्­त म­राठी चित्रपट ‘चुंबक’. राष्­ट्रीय पुरस्­कारविजेते दिग्­दर्शक संदीप मोदी यांचे दिग्­दर्शन आणि अक्षय कुमार प्रस्­तुत चित्रपट ‘चुंबक’मध्­ये साहिल जाधव, स्­वानंद किरकिरे आणि संगम देसाई प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ नोव्­हेंबर, २०२१ रोजी सो­नी लिव्­हवर प्रदर्शित होणार आहे.

‘चुंबक’ ही किशोरवयीन रेस्­टॉरंट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे. तो त्­याचे स्­वप्­न साकारण्­यासाठी लोकांची फसवणूक करण्­याचे ठरवतो. त्­याचा एकमेव बळी ठरलेले प्रसन्­न (स्­वानंद किरकिरे) यांच्­याशी सामना होतो. प्रसन्­न हे बौद्धिक अक्षमता असलेले वृद्ध आहेत. त्यानंतर बाळू नैतिकता व स्­वप्­नांच्­या दुविधेमध्­ये अडकून जातो. दोघेही एका प्रवासावर निघून जातात, जो त्­यांच्­या जीवनाला कायमस्­वरूपी कलाटणी देतो. बाळू त्­याच्­या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्­यासाठी निरागस व्­यक्­तीची फसवणूक करेल का की, त्­याचे मन बदलेल?, कायरा कुमार क्रिएशन्­सचे नरेन कुमार निर्मित ‘चुंबक’ हा केप ऑफ गुड फिल्­म्­स प्रॉडक्­शनचा चित्रपट आहे.
बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार सादर करत असलेला मराठी चित्रपट चुंबकचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अक्षयने ट्विटरवर चुंबकचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करताना त्याने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. अक्षयने म्हटले आहे, ‘हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. या चित्रपटाने अनेकांची मने जिंकून घेतली आहेत. मला हा चित्रपट सादर करताना खूप गर्व वाटत आहे, तर रहा सोनी लिव्हवर. क्रिटिकली अक्लेम्ड मास्टरपीस चुंबकसाठी. हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्वानंद किरकिरे, साहिल जाधव आणि संग्राम देसाई यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप मोदी यांनी सांभाळली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …