नवी दिल्ली – राजस्थानचा भावेश शेखावतने येथे सुरू असलेल्या ६४ व्या नेमबाजी राष्ट्रीय चॅम्पियनशीपमधील पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तल स्पर्धेत रविवारी येथे सुवर्ण पदक पटकावले, तर पुनरागमन करणारा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता विजय कुमार चौथ्या स्थानी राहिला. शेखावतचे हे पहिले जेतेपद होते व याच स्पर्धेचे रौप्य पदक सैन्याच्या गुरप्रीत सिंगने जिंकले. कांस्य पदक हरियाणाच्या अनीष भानवालाच्या नावे राहिले, ज्याने ज्युनियर रॅपिड फायर स्पर्धेत सुवर्ण पदकांची कामगिरी केली होती. अशाप्रकारे भानवालाने पदक तालिकेत आपल्या राज्याचे अव्वल स्थान बळकट केले. शेखावतने आठ सीरिजच्या फायनलमध्ये ४० पैकी ३३ हिटमध्ये पहिले स्थान प्राप्त केले. गुरप्रीतने २९ ने रौप्य व अनीषने २२ ने कांस्य पदकाची कमाई केली. पाच वर्षांनंतर प्रतिस्पर्धी नेमबाजी स्पर्धेत पुनरागमन करणारा विजय १७ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. युवा विजयवीर सिद्धू व अहनद जवांडाने अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान प्राप्त केले. ज्युनियर पुरुषांच्या फायनलमध्ये भानवालाने शानदार फॉर्म कायम राखले व ३४ गुणांच्या स्कोरने त्याचा सहकारी आदर्श सिंहच्या पुढे पहिल्या स्थानावर राहिला. आदर्शने रौप्य तर सिद्धूने पंजाबसाठी कांस्य पदक जिंकले. स्पर्धेच्या १० दिवसांनंतर अद्याप पिस्तल स्पर्धेत ३२ सुवर्ण पदक दिले गेले, ज्यात हरियाणा १२ सुवर्ण पदक जिंकत अव्वल स्थानी आहे. त्यांचे सर्वात जास्त २७ पदके आहेत. त्याच्यानंतर दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश व राजस्थान यांचा क्रमांक येतो, ज्यांच्या नावे प्रत्येकी चार सुवर्ण पदके आहेत.
One comment
Pingback: Buy psilocybin pills online overnight