ठळक बातम्या

नुसरत भरुचा अभिनीत आगामी भयपट ‘छोरी’चा ट्रेलर रिलीज

छोरी या बहुचर्चित अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा ट्रेलर अमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकताच प्रदर्शित केला. विशाल फुरीया दिग्दर्शित छोरी हा चित्रपट भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा यांनी एकत्रितरित्या निर्माण केलेला असून, त्यामध्ये नुसरत भरुचा, मिता वशिष्ठ, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

छोरी हा या पुरस्कार विजेत्या व समीक्षकांनी गौरवलेल्या लपाछपी या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर भारतासहित अन्य २४० देश-प्रदेशांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या ट्रेलरमध्ये आपल्याला साक्षी (नुसरत भरुचा)शी संबंधित छोरी या पिशाच्च जगाची एक झलक आणि बरेच काही पाहायला मिळणार असून, प्रत्येक दृश्यागणिक प्रेक्षकांवरचा ताण वाढत जाणार आहे. यातील थरार प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा आहे.

‘साक्षी स्वत:ला वाचवू शकेल का?, ती तिच्या गर्भातील बाळाला वाचवू शकेल का?’ प्रेक्षकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटात मिळणार आहेत.
नुसरत भरुचा म्हणाली की, ‘भयपटासारख्या नव्या प्रकारच्या चित्रपटात काम करणे एकाचवेळी घाबरवणारे व उत्साहवर्धक आहे. भय उत्पन्न करणाऱ्या या चित्रपटात प्रेक्षकांना बांधून ठेवेल असा आणखी एक दृष्टीकोन आहे. हा ट्रेलर म्हणजे एका प्रचंड मोठ्या रहस्याची केवळ एक झलक आहे. आम्ही या चित्रपटासाठी घेतलेले कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील,’ अशी मला आशा आहे. मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.

दिग्दर्शक विशाल फुरीया म्हणाले की, ‘छोरी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. ‘छोरी’मार्फत आम्ही एक भयकथा जगभरातील लोकांपर्यंत घेऊन जात आहोत व प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या भयपटाचा आनंद मिळवून देत आहोत. क्रीप्ट टीव्ही, टी सिरीज आणि अबेंडाटिया एंटरटेंमेंट यांच्याबरोबर भागीदारी केल्याचा मला मनस्वी आनंद आहे आणि जगभर चित्रपट घेऊन जाणाऱ्या प्राइम व्हिडीओबरोबर आम्ही काम करत आहोत, याचा मला आनंद आहे.’
छोरी हा विशाल फुरीया दिग्दर्शित व भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा निर्मित आगामी भयपट आहे. हा चित्रपट लपाछपी या मराठी चित्रपटाचा रिमेक असून, त्यामध्ये नुसरत भरुचा हिची मुख्य भूमिका व मिता वशिष्ठ, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल यांच्यादेखील भूमिका आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …