अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहां सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सुरुवातीला बिझनेसमॅन निखिल जैन सोबतचे लग्न अमान्य करून नाते तोडणे नंतर
अभिनेता यश दासगुप्ता याच्याबरोबर जवळीकता वाढवणे. लोक हे सर्व धक्केपचवत असतानाच नुसरत प्रेग्नंट असल्याची खबर आली. त्यानंतर तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली.
मुलाचा पिता कोण आहे? यश दासगुप्ता बरोबर तिचे नाते काय आहे? असे अनेक प्रश्न केले गेले, परंतु नुसरतने कधीही समोर येऊन या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. परंतु आता तिने
केवळ यश दासगुप्ताबरोबरचे नाते राजरोसपणे स्वीकारलेच नाही, तर याविषयी खुलासाही केला आहे.
नुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांनी रेडिओ शो इश्क विद नुसरतमध्ये अनेक खुलासे केले आहे. तिने खुल्लम खुल्ला आपले प्रेम स्वीकारले आहे. यशबरोबर आपल्या नात्याची
सुरुवात कशी झाली, तिच्या नजरेत प्रेमाचा अर्थ काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नुसरतने दिली. जेव्हा नुसरतला तिच्या आणि यशच्या प्रेमाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा
यशने तिला उत्तर देण्यास सांगितले. त्यावेळी नुसरत म्हणाली, ‘मी तुझ्यासोबत पळाले होते’, तर यश म्हणतो,‘तू पळाली होती? तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आपण एकमेकांचा हात
धरून रस्त्यावरून पळालो होतो?’ त्यावर नुसरत म्हणाली,‘नाही, नाही. मी तुझ्यासोबत फरार झाले होते. हेच योग्य शब्द आहेत. हा एपिसोड याच विषयावर आहे. मेरा प्यार, मेरी चॉइस.
माझे तुझ्यावर प्रेम जडले आणि तू माझी चॉइस होता. बाकी सर्व इतिहास आहे.’
नुसरतने भलेही खुलेआमपणे यशबरोबर विवाह केल्याचे स्वीकारलेले नाही, परंतु तिच्या पोस्टवरून या वृत्ताला दुजोरा मिळतो की हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत.