नीरजला अखेर ‘ती’ खास कार मिळाली

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला दिलेले वचन व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केले. खुद्द सुवर्णपदक विजेता नीरजने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला आनंद महिंद्रा यांनी एक एक्सयूव्ही भेट दिली आहे. नीरज चोप्राने या एक्सयुव्हीसाठी ट्विट करून आनंद महिंद्राचे आभार मानले. यावर आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला उत्तर देत म्हटले की, तुम्ही देशाला अभिमान वाटेल, असे काम केल आहे.

नीरजने ट्विट करत धन्यवाद आनंद महिंद्राजी, मी लवकरच या अतिशय खास कारला फिरण्यासाठी बाहेर काढण्यास उत्सुक आहे, असे म्हटले होते. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटले की, तू देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. आशा आहे की, आमच्या चॅम्पियन्सचा रथ असलेल्या एक्सयुव्हीचा तुम्हाला अभिमान वाटेल. दरम्यान, नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले होते. टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अ­ॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी देणार असल्याची घोषणा केली होती. यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी रिओ ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू यांना महिंद्रा कार भेट दिली होती. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांनाही उत्तम कामगिरीसाठी कार भेट दिली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …