नीट-पीजी ईडब्ल्यूएस आरक्षण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

केंद्र सरकार ८ लाखांवर ठाम
नवी दिल्ली – नीट-पीजी समुपदेशन कार्यक्रम २०२१ संदर्भातील सवार्ेच्च न्यायालयातील सुनावणी आता ५ जानेवारीला म्हणजेच बुधवारी होणार आहे. ईडब्ल्यूएस कोट्यातील आरक्षणाबाबत उत्पन्न मर्यादा निश्चित करताना केंद्राच्या वतीने याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याप्रकरणी सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, सरन्यायाधीश न्या. रमणा यांनी याप्रकरणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता या प्रकरणावरील सुनावणी बुधवारी (५ जानेवारी) होणार आहे.
नीट-पीजीमधील ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी ओबीसी प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादा कशी निश्चित करण्यात आली, असा सवाल सवार्ेच्च न्यायालयाने केला होता. त्यावर केंद्राकडून ८ लाख उत्पन्न मर्यादेचे समर्थन करण्यात आले होते. ८ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा निश्चित करताना केंद्राने नव्या अटी जाहीर केल्या आहेत. ८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. पाच एकर शेतजमीन किंवा त्याहून अधिक शेतजमीन असणारे शेतकरी कुटुंब, अधिसूचित नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील १०० चौ. फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राचा प्लॉट आणि अधिसूचित नसलेल्या नगरपालिकांमधील २०० चौरस फूट प्लॉट नावावर असणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांच्याकडे एक हजार चौरस फू ट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावरील घर असेल त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही, असे केंद्र सरकारने आपल्या अटींमध्ये नमूद केले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट समुपदेशन प्रक्रिया ६ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नीट-पीजीमधील ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरू असल्याने त्यासंदर्भात नेमका काय निर्णय होणार? हे पहावे लागणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण प्रकरण सवार्ेच्च न्यायालयात असल्याने आता काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना संसर्ग आणि इतर कारणांमुळे नीट-पीजी परीक्षा २०२१ अगोदर ८ महिने उशिरा झाली आहे. नीट-पीजी समुपदेशन व्हावे, म्हणून ज्युनिअर डॉक्टर संपावर देखील गेले होते. ईडब्ल्यूएस आरक्षणप्रकरणी यापूर्वीची सुनावणी न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. विक्रमनाथ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर झाली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …