नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास न्यायालयाची परवानगी

मुंबई- केवळ दोन विद्यार्थ्यांसाठी १६ लाख विद्यार्थ्यांचेभवितव्य अधांतरी ठेवता येणार नाही, असा महत्वपूर्णनिकाल देत सर्वोच्च न्यायालयानेनीट निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत त्रुटी असल्याचं सांगत दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. हायकोर्टानंया याचिकेनंतर नीट निकाल थांबवला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयानेम्हटलं की, २ विद्यार्थ्यांसाठी आम्ही निकाल थांबवू शकत नाही. १६ लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत. न्यायालयाने याचिका दाखल केलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मुद्यावर एनटीएला नोटिस जारी केली आहे. दिवाळीनंतर यावर सुनावणी होणार आहे.
हा निकाल लागण्यास होत असलेल्या उशीरामुळं एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अशा मेडिकल पाठ्यक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, त्यांना देण्यात आलेली टेस्ट बुकलेट आणि अन्सर बुकलेट मॅच करत नव्हती. या उमेदवारांनी तत्काळा निरीक्षकांच्या समोर हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही.
न्यायालयानेएनटीएला याचिकाकर्तावैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचं सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचं सांगितलं आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …