एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपल्या निष्काळजीपणाची कहाणी शेअर केली आहे. तीन वर्षांत त्या माणसाच्या पायातल्या लहानशा गाठीने एवढे भयंकर रूप धारण केले की, तो आता चालायलाही हतबल झाला आहे. त्या व्यक्तीला आधी वाटले की, त्याच्या पायातील गाठ बरी होईल. यामुळे त्याने डॉक्टरांकडे जाण्याचे टाळले, पण हा निष्काळजीपणा त्याला महागात पडला. तीन वर्षांत आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, त्याला आता चालता-फिरताही येत नाही.
निष्काळजीपणा कधीच चांगला नसतो. तुम्ही गाडी चालवण्यात निष्काळजी असाल किंवा इतर कामात, त्याचा परिणाम चांगला नाही. विशेषत: लोक रोगांबद्दल बेफिकीर असतात, जे नंतर त्यांच्यावर भारी पडतात. कर्नाटकात राहणाºया नागेशने सोशल मीडियावर आपली अशीच बेफिकिरी लोकांसोबत शेअर केली. आपण जी चूक केली, ती इतर कोणी करू नये, असा इशारा नागेशने जनतेला दिला. नागेश गेल्या तीन वर्षांपासून लिम्फेडेमा एलिफंटियासिस या आजाराने त्रस्त आहे. त्याला हत्ती पाय असेही म्हणतात. नागेशच्या निष्काळजीपणामुळे त्याला आता चालता येत नाही.
आपल्या आजाराबाबत नागेशने सांगितले की, सुरुवातीला त्याच्या पायात एक छोटीशी गाठ होती. ही गाठ डोळ्यांना दिसत नव्हती. हात लावल्यावरच कळले की पायात गाठ आहे. नागेशचे बालपण रस्त्यावर गेले असल्याने त्याने याला फारसे महत्त्व दिले नाही. त्याचा परिणाम असा झाला की, हळूहळू या गाठीने भयंकर रूप धारण केले. आता नागेशचा पाय इतका सुजला आहे की, तो उभाही राहू शकत नाही. आता शस्त्रक्रिया केल्याशिवाय त्यांची प्रकृती बरी होऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
२०१८ मध्ये नागेशच्या पायात अचानक गाठ तयार झाली. गरिबीत एक वेळचे अन्नही मिळत नसल्याचे तो म्हणाला. अशा स्थितीत डॉक्टरकडे जाणे म्हणजे पैशांची उधळपट्टीच वाटली, मात्र या निष्काळजीपणाचे भीषण परिणाम दिसून आले. काही दिवसांच नागेश चालायला हतबल झाला. त्याला कोणीही मदत केली नाही. तो रस्त्याच्या कडेला पडून होता. एका एनजीओच्या मदतीने नागेशला राहण्यासाठी छप्पर मिळाले. नागेशची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अशा परिस्थितीत आता नागेशने लोकांकडून मदत मागितली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नागेशच्या उपचारावर जवळपास ३० लाख रुपये खर्च झाले आहेत. नागेशला त्याचा उपचार परवडत नसल्याने एनजीओ त्याच्यासाठी निधी गोळा करत आहे. उपचारानंतर नागेशच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोकही पुढे येऊन नागेशला मदत करत आहेत. अशा परिस्थितीत नागेशलाही तो लवकर बरा होईल, अशी आशा वाटू लागली आहे.