निवडणुकीच्या कामाला लागा – उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई – राज्याची राजधानी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील २२७ शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आमदार, खासदार यांची ही महत्त्वाची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे, ज्याला दाखवायचे आहे त्याला मी त्याच वेळी करून दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी कामाला लागा, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश दिला. मुंबई महापालिकेने महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या सहकार्याने नुकताच मुंबईतील पाचशे चौरस फुटांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय आपण घेतलाय तो जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विकास कामाची पोहोचपावती मिळायला हवी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे, या टीकेला मी शांतपणे घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी माझ्या कामाने माझी पोहोचपावती देतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेची कामे करा आणि जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे असा संकल्प करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग-बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचणे गरजेच असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मोठ-मोठे बॅनर लावू नका ते जनतेला आवडत नाहीत, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडेदहा वाजता सुरू झालेली बैठक साडेअकराला संपली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …