बॉलीवूडमध्ये नुकतेच आलेले गाणे कुसू कुसूमुळे चर्चेत असलेली नोरा फतेही ही आपल्या लुक्समुळे कायमच सोशल मीडिया युझर्सची आवडती अभिनेत्री ठरली आहे. त्यातही जर तिने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तर लोक अजूनच तिच्यावर प्रेमाची बरसात करताना दिसून येतात. आता अलीकडेच नोराने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत जे पाहून सोशल मीडिया युझर्स तिच्या सौंदर्याचे दिवाने झाले आहेत.
नोरा अलीकडेच डान्स रिॲलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये जज म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळचा नोराचा हटके अंदाज लोकांना खूप आवडला. नोराने त्यावेळी निळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. त्याच्या जोडीला तिने लो वेस्ट साइड स्लिट स्कर्ट परिधान केला होता. या ड्रेसमध्ये नोरा खूप आकर्षक वाटत होती. आता तिने या लूकमधील आपले काही फोटो सोशल मीडियावरील चाहत्यांबरोबरही शेअर केले आहेत. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नोराने हे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे.
2 comments
Pingback: togelbet168
Pingback: บ้านมือสอง