निलंबित केलेल्या एसटी कर्मचाºयाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

१० डिसेंबरला करण्यात आली होती निलंबनाची कारवाई
मुंबई – एसटीच्या संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्‍यात आलेले राजापूर आगारातील चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते (३५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. गेले काही दिवस राज्यात एसटीच्या कर्मचाºयांचा संप सुरू असून, संप मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे सातत्याने आवाहन शासनाकडून होत आहे. सेवेत हजर न झाल्याने संबंधित कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. काही कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजापूर आगारातील सुमारे २० आणि २५ कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाºयांनी दिली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते यांचाही सामावेश होता.

१० डिसेंबरला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तणावाखाली होते, अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाºयांनी दिली. अत्यावस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरू असताना रात्री १०.३० दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचा मृत्‍यू झाला. राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. पत्नी व दोन मुलांसह राजापुरात राहत होते.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …