
* खासदारांनी माफी मागावी- व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्राच्या सुरुवातीलाच सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. याप्रकरणी केंद्र सरकारने विरोधी पक्षातील १२ खासदारांना निलंबित केले. विरोधकांनी आजही राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. निलंबन मागे घेण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.
रोधी पक्षाने संसदेचे सत्रात गदारोळ घालूनये, ही निलंबनाची पहिलीच वेळ नसून, याआधी देखील निलंबन करण्यात आलेअसल्याचेसभापती म्हणाले. तसेच, निलंबित खासदारांनी राज्यसभेत माफी मागावी त्यानंतरच त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे देखील नायडू म्हणाले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसभापती हरिवंश यांच्याशी चर्चाकरण्याची मागणी केली. परवानगी न मिळाल्यानेकाँग्रेस खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, टीआरएस आणि आययूएमएलनेही राज्यसभेतून सभात्याग केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या १२ खासदारांवर निलंबनाची कारवाईकरण्यात आली. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये एल्माराम करीम (माकप), फुल्लो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनॉय बिस्वाम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांत छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नासीर हुसेन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) यांचा समावेश आहे. या राज्यसभेच्या १२ सदस्यांना निलंबन मागेघेण्यास सभापती नायडूयांनी स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर विरोधी पक्षानेजोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी हाताला काळी पट्टी बांधत निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच माफी मागणार नसल्याचे ठामपणे सांगितले.