निर्मला सीतारामन सलग तिसºयांदा फोर्ब्सच्या यादीत

एकूण चार भारतीय महिलांचा समावेश!
नवी दिल्ली – फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश होत आहे. यावर्षी सलग तिसºयांदा निर्मला सीतारामन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांनी अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन यांनादेखील मागे टाकले असून, थेट ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे. जगभरातील १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये एकूण चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये निर्मला सीतारामन यांचा क्रमांक सर्वात वरचा असून, त्याखालोखाल ५२, ७२ आणि ८८ अशा क्रमांकावर भारतीय महिला आहेत.

२०१९ आणि २०२० या दोन वर्षी फोर्ब्सने जाहीर केलेल्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारामन यांचा समावेश झाला होता. यंदा पुन्हा एकदा त्यांची या यादीमध्ये वर्णी लागली असून, त्या ३७ व्या क्रमांकावर आहेत. त्याउलट अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन या ३९ व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी निर्मला सीतारामन या यादीमध्ये ४१व्या स्थानी होत्या.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …