निमंत्रित महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा: रिझवी, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय विजेते


मुंबई – श्री आनंद भारती ठाणेतर्फेचंपासष्ठी उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या निमंत्रित आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुलांमध्ये रिझवी महाविद्यालयानेजोशी-बेडेकर महाविद्यालयावर, तर मुलींमध्य कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयानेजोशी-बेडेकर महाविद्यालयावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू म्हणून शुभम शिगवण (रिझवी), रूपाली बडे (कर्मवीर पाटील), तर सर्वोत्कृष्ट आक्रमनासाठी अक्षय भोईर (जोशी-बेडेकर), अंजली कनोजा (जोशी-बेडेकर), आणि अष्टपैलू खेळाडू ओंकार सोनावणे(रिझवी), साक्षी तोरणे(कर्मवीर पाटील) या खेळाडूगौरवण्यात आले.
आनंद भारतीच्या क्रीडांगणावर पार पाडलेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये रिझवी, अग्रवाल, ज्ञान साधना, झुनझुनवाला, जोशी-बेडेकर, केळकर, रा. फ. नाईक, व किर्ती या महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. तर मुलींमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, केळकर, रा. फ. नाईक, किर्ती, झुनझुनवाला, अग्रवाल, ज्ञान साधना व जोशी-बेडेकर या महाविद्यालयांनी भाग घेतला होता.
मुलांच्या अंतिम सामन्यात रिझवी महाविद्यालयाने जोशी-बेडेकर महाविद्यालयावर २५-१२ असा १३ गुणांनी विजय संपादन केला. रिझवीच्या शुभम शिगवण (२:२०, २:१० मि. संरक्षण व २ बळी), ओंकार सोनावणे (१:५०, नाबाद २:०० मि. संरक्षण व ७ बळी), निहार दुबळे (२:५० मि. संरक्षण व ६ बळी) व प्रतीक होडवडेकर (१:१० मि. संरक्षण व ४ बळी) यांनी विजयात मोलाची कामगिरी पार पाडली तर जोशी-बेडेकरच्या अक्षय भोईर (१:१०, १:५० मि. संरक्षण व ३ बळी), आकाश आजीवले (१:२०, १:४० मि. संरक्षण) यांचाच खेळ चांगला झाला.
मुलींच्या अंतिम सामन्यात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने जोशी-बेडेकर महाविद्यालयावर १८-०८ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. कर्मवीरच्या रूपाली बडे (४:३० मि. संरक्षण व २ बळी), साक्षी तोरणे (२:२० मि. संरक्षण व ६ बळी), पुजा फरगडे (२:३० मि. संरक्षण व ४ बळी) गीतांजली नरसाळे (२:३० मि. संरक्षण) यांच्या खेळीच्या जिवावर एकतर्फी विजयाची नोंद केली. तर जोशी-बेडेकरच्या दीक्षा सोनसुरकर (१:४०, १:०० मि. संरक्षण व ३ बळी), दिशा भारती (३ बळी) व अंजली कनोजा (२ बळी) यांनीच थोडाफार प्रतिकार केला, मात्र त्यांना इतर कोणाचीहि साथ न मिळाल्याने मोठ्या परभवाला सामोरे जावे लागले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …