जामिनावर आज फैसला
कणकवली (सिंधुदुर्ग) – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर गुरुवारी येथील सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. बुधवारचा युक्तिवाद संपला असून, गुरुवारी या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणेंना जेल होणार की बेल मिळणार, याचा फैसला गुरुवारी होणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना अटक होणार की नाही, हे देखील यावेळी स्पष्ट होणार आहे.
मंगळवारी सत्र न्यायालयाने नितेश राणेंना अंतरीम जामीन देण्याची मागणी फेटाळली होती. नितेश राणे हे नेमके कुठे आहेत, याचेही गूढ कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बुधवारी नोटीस पाठवली होती. ही नोटीस नारायण राणेंच्या घरावर चिकटवण्यात आली होती. ही नोटीस दहा मिनिटांतच काढूनही टाकण्यात आली. दुसरीकडे, नितेश राणे यांचे सचिव आणि राणे समर्थक पॅनलच्या उमेदवाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांचे पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदुर्ग पोलीस कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाताळातून शोधू – राऊत
नाशिक – नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये. नितेश पाताळात लपले असतील, तरी त्यांना शोधून काढू, असा दावा बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येथे केला. संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असेल तर! असे सूचक विधानही त्यांनी केले. मात्र, यावर जास्त विचारणा केली असता, मी आताच बोलत नाही. काही सांगता येत नाही ना, म्हणत त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे टाळले. राजकीय सुडापोटी आमच्यावर कारवाया केल्या. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: führerschein kaufen original