नाशिक महापालिका निवडणूक : ३ दिवसांत कच्ची प्रभाग रचना होणार अंतिम


नाशिक – नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल केव्हाच वाजले आहे. अशात येणाऱ्या ३ दिवसांत कच्ची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्याने अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे. यात प्रामुख्याने ३३ हजार मतदारांचा एक प्रभाग होण्याची शक्यता आहे, तर २२ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जाती-जमातीची असल्याने प्रभाग रचनेच्या फेरबदलाचा अंतिम निर्णय महापालिका आयुक्त घेणार आहेत. त्यानंतरच ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सोपविली जाणार आहे.

नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे २६ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्च्या आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते; मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. मात्र, आता नगरसेवकांची संख्याही १२२ वरून १३३ वर नेण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा या कामात बदल करावा लागणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणत: ३६ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता; मात्र नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या ३३ हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभागरचनेचे काम पुन्हा करावे लागत आहे. नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या महापालिकांसाठी ३० नोव्हेंबरची मुदत होती. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूरसाठी १८ नोव्हेंबर, तर लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगावसाठी २५ डिसेंबरची मुदत आहे. पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी हे काम १५ फेब्रुवारीपर्यंत करावे लागेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …