नाशिकमध्ये ४० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; चारही जणांना अटक

नाशिक – दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरातून घरी परतणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेवर चार संशयितांनी अत्याचार केल्याची घटना बुधवारी (२७ ऑक्टोबर) रात्री घडली. पोलिसांनी चारही जणांना अटक केले असून, सोमनाथ गायकवाड, संदीप पिठे, राजेंद्र गांगुर्डे व आकाश सिंग अशी नावे आहेत. हे चारही संशयित २१ ते २५ वयोगटातील असून, सर्व जण वणीतीलच रहिवासी आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातही आता महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा कळीचा बनला आहे.
महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वणी येथील ४० वर्षीय महिला बुधवारी रात्रीच्या सुमारास शहरातील एका औषध दुकानातून औषधे घेऊन वणी बसस्थानकासमोरून घरी परतत होती. त्यादरम्यान महिला लघुशंकेसाठी बसस्थानकाजवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूस गेली होती. त्याचवेळी तेथे आलेल्या दोन संशयितांनी तिला एकटीला पाहून आणि अंधाराचा गैरफायदा घेत तिच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तेथे मोटारसायकलवरून त्यांचे अन्य दोन साथीदार दाखल झाले व त्यांनीही महिलेला बसस्थानकासमोरील काटवनात ओढत नेत मारहाण केली आणि आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर चारही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. हे कृत्य करताना सर्व संशयित मद्यधुंद अवस्थेत होते.

घटनेनंतर पीडित महिलेने वणी पोलीस ठाणे गाठून, आपबिती कथन केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता, घाबरून पळून गेलेले संशयित घटनास्थळावर त्यांची राहिलेली मोटारसायकल घेण्यासाठी परत आले असता, पोलिसांनी संशयितांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पीडित महिलेने चौघांनाही ओळखल्यानंतर चारही जणांना अटक केली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …