नाशिकमध्ये भाजप नेत्याची हत्या

नाशिक – नाशिकमध्ये मागील पाच दिवसांत तिसरा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अमोल यांना फोन करून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे, तसेच शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरूच आहे. नाशिकमधील विविध भागांत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, त्यामुळे नाशिकमधील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याच्या डोक्यावर दगड टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर गर्दी करून ठिय्या आंदोलन केले.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …