मुंबई – नवजात बाळाला वाचवल्याची एक वेगळी घटना समोर आली आहे. मुंबईतील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होते. पहिल्यांदा त्याला मांजरींनी पाहिले आणि त्यांनी आवाजाने आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केले. यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी पोहोचून नवजात अर्भकाला नाल्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला.
मुंबई पोलिसांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यात असे सांगण्यात आले की, एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती. शेजारच्या मांजरींनी ओरडून गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून, बाळ आता सुरक्षित आहे. मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाने दक्षता दाखवत तात्काळ कारवाई केल्याने या निरागस बाळाचा जीव वाचला. बाळाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता नवजात अर्भक धोक्याबाहेर असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये नवजात बालकाचा फोटोही शेअर केला आहे; मात्र मुलाच्या आई-वडिलांची किंवा त्याला नाल्यात सोडणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.
One comment
Pingback: 늑대닷컴